कॅन्सरपासून हृदयापर्यंत आजारांचा धोका, धूम्रपान टाळा; जाणून घ्या तंबाखू विरोधी दिनाचं महत्व..

कॅन्सरपासून हृदयापर्यंत आजारांचा धोका, धूम्रपान टाळा; जाणून घ्या तंबाखू विरोधी दिनाचं महत्व..

World No Tobacco Day 2024 : जगभरात ३१ मे रोजी दरवर्षी वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणजेच जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day 2024) साजरा केला जातो. तंबाखूच आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होणार याची जाणीव असतानाही तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. बिडी, सिगारेटच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची भीती शक्यता असते. यातच कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो.

अशा वेळी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू विरोधी दोन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार धूम्रपान केल्याने रोज 14 जणांचा मृत्यू होत आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्याची गरज का भासली याची माहिती जाणून घेऊ या..

आजच्या जमान्यात ई सिगारेट, हुक्का आणि गांजा या पदार्थाचे सेवन वाढत चालले आहे. ई सिगारेट मध्ये सुद्धा निकोटिन असते. ज्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. आजकाल सेकेंड हॅण्ड स्मोकिंगचा धोका वाढत चालला आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच शिवाय त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही सिगारेटच्या धुराचा त्रास होतो. तंबाखू असलेला कोणताही पदार्थ कॅन्सर सारख्या घातक आजाराला निमंत्रण ठरू शकतो.

Shreyas Talpade: कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका? अभिनेत्याचा खळबळजनक दावा

जागतिक तंबाखू विरोधी दिवसाची सुरुवात कधी झाली

सर्वात आधी सन १९८७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या काळात तंबाखूच्या सेवनाने मृत्युमुखी पडणाऱ्याच्या संख्यात वाढ झाली होती. परंतु एप्रिल १९८८ मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यानंतर मात्र मे महिन्यात हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.

तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व

जगात युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. अशा वेळी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज वाढली आहे. याच कारणामुळे तंबाखू विरोधी दिवस अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यावर भर दिला जात आहे. तंबाखूमुळे फुप्फुसाचा कर्करोग, दीर्घकालीन ब्रोन्कायटिस, एमेम्सीसेमा, हृदयविकार, कर्करोग, ल्युकेमिया, मोतिबिंदू, टाइप 2 मधुमेह, न्यूमोनिया असे आजार होण्याची शक्यता असते.

ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 100 जण ताब्यात : CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

तंबाखू विरोधी दिनाची थीम

जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी दरवर्षी नवीन थीम निश्चित केली जाते. यावर्षी Protecting Children from Tobacco Industry अशी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ तंबाखू उद्योगापासून मुलांचे संरक्षण करणे जेणेकरून भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करता येईल. यासाठी तंबाखू विरोधी दिवसाची यावेळची थीम निश्चित करण्यात आली आहे. तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज