धक्कादायक! तब्बल 11 टक्के भारतीय ‘या’ आजाराच्या उंबरठ्यावर; सवयी बदला अन् सेफ व्हा

Cancer Risk in India : जगातील कॅन्सरच्या आजाराचा विचार केला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर (Cancer in India) आहे. भारतात कॅन्सर या घातक आजाराचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत चालले आहेत. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. या दोन्ही देशांची लोकसंख्याही प्रचंड आहे. यामुळे देखील या देशांत कर्करोगाचे रुग्ण जास्त आढळून येतात. International Agency for Research on Cancer च्या GLOBOCAN 2022 मधील माहितीनुसार भारतात कॅन्सरची 14 लाख प्रकरणे समोर आली होती. यातील 9 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यूही झाला. आता जाणून घेऊ या की भारतात इतक्या मोठ्या संख्येने कॅन्सरचे रुग्ण का आढळून येत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक रिसर्च करण्यात आला होता. या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 ऑगस्ट रोजी जावा नेटवर्कचा एक अहवाल समोर आला. यात म्हटले आहे की भारतातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे. म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के लोक या घातक आजाराच्या विळख्यात सापडू शकतात. National Cancer Registry Programme Investigator Group ने हा शोध केला आहे.
या अभ्यासात सात लाखांपेक्षा जास्त कॅन्सरच्या प्रकरणांवर रिसर्च करण्यात आला. तसेच कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या 2 लाख प्रकरणांचाही अभ्यास करण्यात आला. या आकडेवारीचा विचार केला तर आता कॅन्सर देशासाठी मोठी समस्या तर आहेच शिवाय आता ही समस्या मोठं आव्हान बनलं आहे.
जपानमध्ये नवा नियम! दिवसातून फक्त 2 तासच स्मार्टफोन वापरता येणार
कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका
मिझोराम राज्याची राजधानी एजॉल शहरात सर्वाधिक कॅन्सर रुग्ण आहेत. येथे प्रत्येक 1 लाख पुरुषांत 526 पुरुष कॅन्सरग्रस्त तर प्रत्येक 1 लाख महिलां 217 महिला कॅन्सरग्रस्त आढळून आल्या. पूर्वोत्तर भारतातील सहा जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती आहे. या जिल्ह्यांत कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. या व्यतिरिक्त काश्मीर, केरळ राज्यांतही कॅन्सरचा वेग जास्त दिसून आला. हैदराबाद शहरात प्रत्येक 1 लाख महिलांपैकी 154 महिला कॅन्सरबाधित आढळून आल्या.
मुख कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक
देशाच्या पू्र्वोत्तर भागात दोन प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यात एसोफॅगल कॅन्सर आणि पोटात होणारा कॅन्सर या दोन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोठ्या शहरांत ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सरचे (Oral Cancer) रुग्ण जास्त आढळून येत आहेत. तर ग्रामीण भागात सर्वाइकल कॅन्सरचे रुग्ण जास्त आढळून येत असल्याचे अभ्यासातून दिसले आहे.
दिल्लीतही स्थिती चिंताजनक
देशाची राजधानी दिल्ली शहरांतही कॅन्सरची स्थिती अतिशय गंभीर आहे. येथील प्रचंड प्रदूषण, बदललेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तपासणीकडे दुर्लक्ष यामुळे कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीतील तरुण वर्गात ब्लड कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.
अलीकडच्या काही वर्षांत फक्त दिल्ली शहरातच या प्रकराच्या कॅन्सरचे तीन हजार नवीन रुग्ण सापडले. यात 30 ते 40 वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ही बाब नक्कीच काळजीत टाकणारी आहे.
दिल्लीत फक्त ब्लड कॅन्सरच नाही तर फुप्फुसांच्या कॅन्सरचेही प्रमाण वाढत आहे. धूम्रपान करत नसलेल्या लोकांनाही फु्प्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढला आहे हे विशेष म्हणावे लागेल. दिल्लीत वाढलेले प्रदूषण आणि दुषित झालेली हवा या दोन गोष्टी याला कारणीभूत ठरत आहेत. दररोज श्वास घेतानाच पीएम 2.5 सारखे विषारी कण शरीरात जात आहेत. यामुळे फुप्फुसांचा कॅन्सर आणि अन्य श्वसनाचे आजार होत आहेत.
सर्दी, खोकला, ताप? व्हायरल फिवर टाळण्यासाठी करा हे प्रतिबंधात्मक उपाय
काय आहे उपाय
कॅन्सरचे प्रमाण वाढण्याच्या मागे वाढत जाणारं वय, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली, प्रदूषण तसेच वेळेवर निदान आणि उपचार होत नाहीत या गोष्टी कारणीभूत आहेत. देशातील 11 टक्के जनता कॅन्सरच्या उंबरठ्यावर उभी आहे ही खरंतर धोक्याची घंटाच आहे. या आजाराला आटोक्यात आणायचं असेल तर खाण्यापिण्याच्या सवयीत सुधारणा, नियमित तपासणी आणि योग्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.