ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 100 जण ताब्यात : CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 100 जण ताब्यात : CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी (Police) रेव्ह पार्टीवर छापा टाकून तब्बल 100 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. (Police raided a rave party on New Year’s eve and detained around 100 people)

दरम्यान, या घटनेवरुन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. सर्रास रेव्ह पार्टी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हयात सर्वाधिक रेव्ह पार्ट्या होत आहेत. अंमली पदार्थांमुळे राज्य बुडत चालले आहे. गुटखा, तंबाखू विकला जात आहे. महाराष्ट्रात कायदा सुवस्था बिघडली आहे. त्याकडे सरकारचं लक्ष नाही, असा निशाणा त्यांनी साधला.

राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाला टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात काहीच पकडत नव्हते. आमच्या काळात पाच हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहेत. ठाण्यातही कारवाई होत आहे. मुंबई आणि राज्यातील शाळा, कॉजेलच्या आजूबाजूला जिथे जिथे ड्रग्ज विकतात असे टपऱ्या, हॉटेल तोडून टाकण्याचे आदेश आहेत. ड्रग्ज विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा :

मिळालेल्या माहितीनुसार, वडवली खाडी किनाऱ्यावर जंगलात आतील बाजूस 19 वर्षीय आणि 23 वर्षीय दोन तरुणांनी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. यात अंमली पदार्थांचे सेवन होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. यात 90 पुरुष आणि 5 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला का? CM शिंदेंनी तीन वेळा टाळलं पण, ठणकावूनच सांगितलं

या सर्वांनी अंमली पदार्थांचे सेवण केल्याचे आणि मद्यपान केल्याचे आढळून आले. यावेळी एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. या सर्वांवर एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज