Satyjeet Tambe- Sujay Vikhe : तुम्ही शिवाजीराव कर्डिलेंना भेटा…विखेंनी दिला सत्यजित तांबेंना सल्ला

Satyjeet Tambe- Sujay Vikhe : तुम्ही शिवाजीराव कर्डिलेंना भेटा…विखेंनी दिला सत्यजित तांबेंना सल्ला

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सध्या राज्यात राजकारण रंगले आहे. यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने तांबे पितापुत्र सध्या चर्चेत आहे. पदवीधारच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन देखील केले आहे. आता याच अनुषंगाने खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना एका सल्ला दिला आहे.

विखे म्हणाले, सत्यजीतला सल्ला आहे की शिवाजीराव कर्डिले (Shivajirao kardile) साहेबांना येऊन भेट. सगळं होऊन जाईल. दरम्यान जिल्ह्याच्या सोनई येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे पुत्र यांचा विवाह सोहळा पार पाडला यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तांबे यांना सल्ला दिला.

पदवीधर निवडणुकी संदर्भात बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचं वैशिष्ट्य आहे, नेमकं काय होतंय आणि कधी काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अपेक्षित वेगळं आणि घडतं अनपेक्षित. हा पण त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. याच्या मागे काय राजकारण आहे ते येत्या काही दिवसात तुम्हाला कळेलच

दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान काँग्रेसमधील बंडखोरीमुळे तांबे हे काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. यातच सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का? हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच नगरमधील भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना एक सल्ला दिला आहे.

विखेंची काँग्रेसवर टीका…
खासदार विखे यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मला काँग्रेसचे आभार मानायचे आहे की मला त्यांनी तिकीट दिले नाही. म्हणून मी बुडत्या जहाजात गेलो नाही. काँग्रेस हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारा व्यक्ती झाला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जशी पुढे जाईल तसे कार्यकर्ते काँग्रेस छोडो करतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube