शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा ‘पप्पू’ ठरवलं; शेलारांच्या खांद्यावरुन उद्धव ठाकरेंचा गोळीबार
आशिष शेलार यांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पु ठरवलं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेलारांच्या खांद्यावरुन गोळीबार केलायं.
Udhav Thackeray On Devendra Fadanvis : आशिष शेलार यांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) महाराष्ट्राचा पप्पु ठरवलंय, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी मंत्री आशिष शेलारांच्या खांद्यावरुन फडणवीसांवर गोळीबार केलायं. मतदारयादीच्या मुद्द्यावरुन शेलार यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. त्यानंतर ठाकरेंनी आपल्या खास शैलीत शेलारांसह फडणवीसांवर निशाणा साधलायं.
कोपरगाव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडा; आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा पप्पु ठरवलंय. फडणवीस मतदारयादीचा घोळ मानतच नव्हते. पण हे बोलण्याचं धाडस आशिष शेलार यांनी दाखवलंय, हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
तसेच बिहारला जाऊन घसा कोरडा करुन आल्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतलीयं, याचा अर्थ त्यांनी काही अमृत पाजलं की काय? मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचं आता आशिष शेलारांनीही सिद्ध केलंय, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
चाहत्यांना धक्का, IPL 2026 मध्ये संजू सॅमसन अन् केएल राहुल बदलणार संघ; ‘या’ संघाकडून खेळणार
हिंदू मुस्लिम मतदार हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, आम्ही संपूर्ण मतदारयादीमध्येच सुधारणा मागत आहोत. त्यामध्ये हिंदू मुस्लिम, जैन, ख्रिश्चन सगळेच आले. त्या दिवशी आम्ही दिलेल्या उदाहरणामध्ये वडिल हिंदू, मुलगा मुस्लिम, असं आहे. वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव इर्शाद नवशाद खान, असं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा
मतदारयाद्यांविरोधात सत्ताधारी काहीच करत नसल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला जाऊन भेटत आहेत. यासोबतच आम्ही न्यायालयाचे दार ठोठावण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत, न्याय भेटला तर भेटला पण भाजपवाले काहीच करताना दिसत नसल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीयं.
