दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका

दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका

Raj Thackeray on Devendra Fadnavis : मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो आहे. तसंल सुख मला नको आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

ते पुढं म्हणाले की राष्ट्रवादी आपल्या पुढं 10 वर्षे अगोदर जन्माला आला पण मी त्याला पक्ष म्हणणार नाही. ती निवडून येणाऱ्या नेत्यांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आहेत. जे जे निवडून येतात त्यांना सोबत घेतात आणि सांगतात हाच माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली.

खऱ्या अर्थाने जर कोणते पक्ष स्थापन झाले असतील तर जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यामध्ये कोणत्याही लोकांचा राजकारणाशी संबंध नव्हता. राजकीय पार्श्वभूमी नसलेले हजारो तरुण-तरुणी पक्षात आहेत. यातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक होतील पण पेशन्स महत्त्वाचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

त्यांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरे पुन्हा पवारांवर बरसले

राजकारणात राहायचं आणि टिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पेशन्स. इतर पक्षाचं यश आपल्याला आत्ता दिसतंय. 2014 साली नरेंद्र मोदींनी यश मिळालं पण त्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. 1952 साली जनसंघाची स्थापना झाली होती. अनेक लोकांनी खस्ता खाल्ल्या तेव्हा हे यश मिळालं आहे. अचानक यश मिळालं नाही. गेल्या आठरा वर्षात चढ कमीच पाहिले, उतार जास्त पाहिले पण या काळात तुम्ही आमच्यासोबत राहिलात. यश कुठं जाणार आहे, निश्चित यश मिळणार, यश मिळून देणार हा माझा शब्द आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

कोल्हापूरमध्ये दोन राजघराणे येणार आमने-सामने? शाहू महाराजांविरोधात समरजीतसिंह घाटगेंची चर्चा

मनसेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकच्या दादासाहेब सभागृहात सुरु आहे. वर्धापन दिन सोहळ्यातून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी सोशल मिडियाचा कसा योग्य वापर केला पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज