Chinchawad Vidhansabha Election:वहिणींचे तिकीट कापून, दीर शंकर जगतापांना उमेदवारी

  • Written By: Published:
Chinchawad Vidhansabha Election:वहिणींचे तिकीट कापून, दीर शंकर जगतापांना उमेदवारी

BJP Candidate List : भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना अनेक ठिकाणी भाजपनं ((BJP) पूर्वीच्याच आमदारांना संधी दिल्याचं दिसून येतं. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला. चिंचवड मतदारसंघातून भाजपने अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना डावलून चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी दिली.

देवाचं स्वतःहून बोलावणं येतं; अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला! 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपने आज अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचाही समावेश आहे. शंकर जगताप यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत किती महिलांना स्थान? नगर जिल्ह्यातून प्रतिभा पाचपुते अन् मोनिका राजळेंना संधी…. 

शंकर जगताप हे एकेकाळी नगरसेवक होते आणि सध्या ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत. ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, तर आमदार अश्विनी जगताप यांचे दीर आहेत. अश्विनी जगताप यांचा पत्ता कट करत भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळं पक्षातील एक गट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, लक्ष्मण जगताप हे चिंचवड मतदारसंघातून भाजपचे आमदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, आता भाजपने अश्विनी जगताप यांना डावलून शंकर जगताप यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळं आता पक्षातील अंतर्गत असंतोष शांत करण्याचे मोठे आव्हान शंकर जगताप यांच्यासमोर असेल.

भाजपमधील काही माजी नगरसेवक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात काही नगरसेवकांनी बैठक घेऊन जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

भोसरीत महेश लांडगेंची मोठी ताकद…
तर भोसरीमधून उमेदवारी जाहीर झालेले आमदार महेश लांडगे हे 2004, 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक राहिले आहेत. 2014 मध्ये अपक्ष आमदार असलेले लांडगे हे 2019 मध्ये भाजपकडून विधानसभेत निवडणून गेले. भोसरी विधानसभेत महेश लांडगे यांची आजही मोठी ताकद आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube