BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत किती महिलांना स्थान? नगर जिल्ह्यातून प्रतिभा पाचपुते अन् मोनिका राजळेंना संधी….

  • Written By: Published:
BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत किती महिलांना स्थान?  नगर जिल्ह्यातून प्रतिभा पाचपुते अन् मोनिका राजळेंना संधी….

BJP Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणू (Maharashtra Assembly Elections) जाहीर झाली असून, सगळ्याच पक्षांनी आता उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरूवात केली. भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने 13 महिलांना संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण (Shrijaya Ashok Chavan) यांनाही पक्षाने उमेदवारी दिली.

विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह आणखी कुणाला संधी? 

यंदा भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचा भाजपमधून पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, जाहीर झालेल्या यादीनुसार पक्षाने अनेक आमदारांना आणखी एक संधी दिल्याचे दिसून येत आहे. भाजपने मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा बेलापूरमधून उमेदवारी दिली आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मोनिका राजळेंना शेवगावमधून उमेदवारी देण्यात आली.

विखे, कर्डिले, राम शिंदे, राजळेंना भाजपचे तिकीट; श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी 

अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या यादीत 13 महिलांचा समावेश
श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
अनराधा चव्हाण – फुलंबरी
सीमा हिरे – नाशिक पश्चिम
सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
मंदा म्हात्रे – बेलापूर
मनीषा चौधरी – दहिसर
गोरेगाव – विद्या ठाकूर
माधुरी मिसाळ – पर्वती
मोनिका राजळे – शेवगाव
प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
नमिता मुंदडा – केज
श्वेता महाले – चिखली
मेघना बोर्डीकर – जिंतूर

अश्विनी जगताप यांचा पत्ता कट…
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप हे चिंचवड मतदारसंघातून भाजपचे आमदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, आता भाजपने शंकर जगताप यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube