Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! चिंचवडमध्ये शंकर जगताप विजयी, राहुल कलाटे यांचा पराभव

  • Written By: Published:
Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! चिंचवडमध्ये शंकर जगताप विजयी, राहुल कलाटे यांचा पराभव

Maharashtra Assembly Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक जेष्ठ नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात आणि कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा देखील पराभव झाला आहे.

तर दुसरीकडे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजय झाले आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरेचा पराभव केला आहे. चुरशीच्या लढतीमध्ये बापूसाहेब पठारे यांनी बाजी मारली आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभव केला आहे.

अजित पवारांनी मारली बाजी

अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे. याच बरोबर कसाब विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने 19,320 मतांनी विजयी झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube