शंकर जगतापांना लाखाच्या ‘लीड’ने आमदार बनवा, मोरेश्वर भोंडवेंची जगतापांना साथ…

  • Written By: Published:
शंकर जगतापांना लाखाच्या ‘लीड’ने आमदार बनवा, मोरेश्वर भोंडवेंची जगतापांना साथ…

पिंपरी-चिंचवड : पिंपरी – चिंचडवचे महापालिकेचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve) हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Assembly Constituency) भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी जगताप यांना जाहीर पाठींबा देत जगतापांना एक लाखाच्या ‘लीड’ने विधानसभेत पाठविण्याच्या निर्धार केला. त्यामुळं जगताप यांचे पारडे जड झाले आहे.

नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करू; यशोमती ठाकूर यांची ग्वाही 

जगतापांना मिळाली भोडवेंची साथ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आणि ‘बेरजेचे’च्या राजकारणासाठी माहीर असलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आता मविआतून बाहेर पडले. भोंडवे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्यानं निवडणुकीआधीच ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वातील मविआला जबरदस्त धक्का बसला. दरम्यान, भोंडवे हे महाविकास आघाडीतून ‘वजा’ झाल्याने आणि त्यांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी भोंडवे हे मतांचा ‘गुणाकार’ करणार हे नक्की.

जगतापांना 1 लाख लीड देणार

मोरेश्वर भोंडवे हे दोन वेळा महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी 2014 मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणुकही लढवली होती. त्यांची चिंचवडमध्ये मोठी ताकद आहे. दरम्यान, आता चिंचवड मतदारसंघात जगताप-भोंडवे यांच्यात दिलजमाई झाली. भोंडवेंच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यांनी शंकर जगतापांना एक लाखाच्या ‘लीड’ने विधानसभेत पाठविण्याचा चंग बांधला आहे. जगताप यांना एक लाखांच्या लीड देऊन विजयी करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाचा गळित हंगाम सुरू, संभाजी पाटील निलंगेकरांची उपस्थिती 

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजयी रथ रोखण्याच्या हेतूने अनेक खेळ्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून चिंजवड भागातील बडे राजकीय नेते गळाला लावण्याच्या खेळ्या खेळल्या गेल्या. मात्र, त्यातून आघाडीचा हेतू आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारांचे कारनामे हळूहळू उघड होताच, आघाडीतील बहुतांश नेते आता महायुतीचे नेते शंकर जगतापांच्या विजयावर मोहोर उमटवत आहेत.

चिंचवडच्या भल्यासाठी जगताप हेच हुकमी एक्का असू शकतात, असा विश्वास महायुतीपलीकडे जाऊन आघाडीतील नेत्यांनाही वाटू लागला आहे. त्यामुळे निवडणूक ऐन गात असतानाच महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या गोटात मात्र आता दिवसागणिक निव्वळ लीडमध्ये हजारो मतांची भर पडणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube