नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करू; यशोमती ठाकूर यांची ग्वाही

  • Written By: Published:
नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करू; यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती: विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देखील झंझावती प्रचार सुरू केला. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व असा विकास करू, असे अभिवचन यशोमती ठाकूर यांनी प्रचारादरम्यान दिले.

कोणकोणाच्या बॅट घशात घालतो, ते 23 नंतर समजेल ; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल 

तिवसा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यशोमती ठाकूर यांचे आदिवासी नृत्य सादर करून ओवाळून व पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात येत असल्याने त्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

“आमदार खोपडेंचा मुलगाच बेरोजगार, हेच भाजपचं अपयश”; पेठेंनी सांगितलं तिकीटाचं कारण 

यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात विविध योजना राबवून कोट्यवधींची विकास कामे खेचून आणली. विकास कार्य आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्या चौथ्यांदा पुन्हा निवडून येतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. शनिवारी प्रचार दौऱ्याला सास सातारगाव, वरुडा, दापोरी, करजगाव, जावरा या भागात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर रविवारी पिंगळादेवी, मंगरूळ, शिरजगाव, काटसुर, अडगाव, विचोरी, वाघोली, लेहगाव शिरखेड, सावरखेड, नेरपिंगळाई आदी गावांना भेटी देऊन अॅड. यशोमती ठाकूर यांनी आपला प्रचार केला.

दरम्यान, त्यांना अनेक संघटनांचेदेखील समर्थन दिले. यशोमती ठाकूर, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यशोमती ठाकूर यांचे हात बळकट….
भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण आणि तिवसा तालुक्यातील गटबाजीला कंटाळून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नरेंद्र राऊत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube