पाटील की देशमुख, राज्यात काँग्रेसची ‘कमांड’ कोणाला? ‘या’ दिवशी होणार घोषणा

  • Written By: Published:
पाटील की देशमुख, राज्यात काँग्रेसची ‘कमांड’ कोणाला? ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Congress President : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव केला आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला (Congress) विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागा मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या हायकमांडकडे राजीनामा पाठवला होता. त्यानंतर राज्यात काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस सोमवारी नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) ,सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड कोणाला राज्याची कमांड देणार याबाबत अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहे.

प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची याबाबत काँग्रेस हायकमांड विचार करत असून माहितीनुसार, आता राज्यात काँग्रेसची कमांड तरुण नेत्याला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असून अमित देशमुख काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे जवळपास ठरलं आहे. काँग्रेस हायकमांडकडून याची घोषणा सोमवारी होणार असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँगेसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर पकड ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला नकार दिला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे.

26 जानेवारीला राज्य सरकार मोठी घोषणा करणार, 21 नवीन जिल्हे होणार? महसूलमंत्र्यांनी केलं स्पष्ट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 237 जागा जिंकले होते तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला होता. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 132, शिवसेना (शिंदे गट) 57, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागांवर विजय मिळावला होता. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनाने (ठाकरे गट) 20, काँग्रेसने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube