बच्चू कडू नौटंकीबाज, सेटलमेंट करून जिंकायचे…; आमदार प्रवीण तायडेंचा हल्लाबोल
Pravin Tayade : अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडेंनी (Pravin Tayade) प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून आजवर जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत, अशी टीका तायडेंनी केली.
राहुल गांधींवर गैरवर्तनाचा आरोप; भाजप खासदार फांगनोन कोन्याक आहेत कोण?
प्रवीण तायडे यांनी आज लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, लोकांच्या मनात 20 वर्षापासून बच्चू कडू यांच्या विरोधात खदखद होती. तसा अचलपूर हा पारंपारिक भापजचा गड होता. विनायकराव कोरडे हे तिथं 10 वर्ष आमदार होते. त्यानंतर मतदारसंघात कडूंच्या हातात गेला. त्यानंतर त्यांनी फक्त 20 वर्ष नौटंकीच केली. पाण्याच्या टाकीवर चढणं काय, अर्धदफन आंदोलन करणं काय? ही सगळी कडू यांची नौटंकीच होती. लोक फक्त नौटंकी कडूंना सत्तेतून खेचण्याची वाट पाहून होते, अशी टीका तायडेंनी केली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा निधी विधेयकाला विरोध, अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार!
कडू वीस वर्षात 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत…
बच्चू कडू यांचं काम मोठं आहे, ते शेतकरी आणि दिव्यांगासाठी धाऊन जातात, याविषयी विचारले असता तायडे म्हणाले, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडूंनी नेमका कोणता उद्योग आणला? ते मतदारसंघात एमआडयसी आणू शकले नाहीत. बच्चू कडूंची वीस वर्षांची कारकीर्द आहे, वीस वर्षात 20 लोकांनाही ते रोजगार देऊ शकले नाहीत, अशी टीका तायडेंनी केली. बच्चू कडूंनी केवळ दडपशाही करून, अधिकाऱ्यांना दमदाटी करून फक्त त्रास दिला, असंही तायडे म्हणाले.
माझ्याशिवाय सरकार बनणार नाही, अचलपूरमधून मुख्यमंत्री राज्याचा गाडा हाकणार असं विधान कडू यांनी केलं होतं. त्यावर बोलतांना अचलपूरच्या मंत्रिमंडळाच काय झालं? असा खोचक टीका तायडेंनी केली. गोमांस तस्कारी, मटका, वाळू तस्कर हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असणार होते का? असा सवाल तायडेंनी केला.
ते सेटलमेंट करून निवडून यायचे
2014 ला आणि 2019 ला बच्चू कडूंच्या विरोधातही मतदान व्हायचं. आवजर ते फक्त दहा हजाराच्या मतांनीच निवडणूक आले. ते सेटलमेंट करून निवडून यायचे, असा आरोपही तायडेंनी केला.
बच्चू कडू यांनी महायुतीत राहून नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार दिला, हे लोकांना आवडलं नाही. कडूंनी मोदींच्या पक्षाची सीट पाडायला नको होती, हा रोष लोकांमध्ये होता. त्यामुळं लोकांनी मला निवडून दिलं, असंही तायडे म्हणाले.