डोनाल्ड ट्रम्प यांचा निधी विधेयकाला विरोध, अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार!
America Shut Down 2024 : अमेरिकेतील अनेक सरकारी कार्यालये बंद होण्याचा धोका आहे. कारण, यूएस सरकार शटडाऊनला (America Shut Down ) सामोरे जातेय. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निधीसंदर्भातील संभाव्य विधेयकाला विरोध केल्यानंतर शटडाऊनची शक्यता आणखी वाढली आहे. ट्रम्प यांनी सरकारला निधी देण्यासाठी स्टॉपगॅप बिल नाकारण्यासाठी काँग्रेसमधील त्यांचे सहकारी रिपब्लिकनवर दबाव आणला. त्यामुळं यूएस सरकार शनिवारी आंशिक शटडाउन सुरू करेल, अशी शक्यता आहे.
वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करावे; बापूसाहेब पठारेंची नितीन गडकरींना मागणी
डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन राजकारणी आणि अमेरिकेचे विद्यमान उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हॅन्स हे दोघेही शटडाऊनची मागणी करत आहेत. त्यांनी काँग्रेसमधील रिपब्लिकन नेत्यांना स्टॉपगॅप फंडिंग बिल (सरकारला निधी उपलब्ध करून देणारे विधेयक) नाकारण्याचे आवाहन केलं. ट्रम्प यांनी फेडरल खर्चावरील द्विपक्षीय करार नाकारल्यामुळे (खर्चाचे विधेयक फेटाळल्यानंतर) यूएस काँग्रेसला शटडाऊन टाळण्यासाठी दोन दिवसांचा अवधी आहे.
मुंबईत तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून लाठीचार्ज, जाणून घ्या काय घडलं?
20 डिसेंबरपर्यंत नवीन विधेयक संसदेने मंजूर केले नाही, तर निधीअभावी 21 डिसेंबरपासून अनेक सरकारी कार्यालये बंद होतील.
दरम्यान, या घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. कारण तो त्या देशाच्या अंतर्गत व्यवस्थेचा भाग आहे.
विधेयक मंजूर झाले नाही तर काय होईल?
सरकारचा सध्याचा निधी यूएस वेळेनुसार 20 डिसेंबरच्या रात्री संपेल. यानंतर ख्रिसमसच्या सुटीपर्यंत संसद बंद राहणार आहे.
जर त्यापूर्वी निधी विधेयक मंजूर झाले नाही तर, सरकारला हजारो फेडरल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागेल आणि अनेक सेवा कमी कराव्या लागतील.
कर्मचाऱ्यांचे पगार रखडले जाणार…
शटडाऊन लागू झाल्यास अत्यावश्यक सेवा ठप्प होतील. हवाई प्रवासापासून कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत सर्व काही विस्कळीत होईल. या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही. त्यांचे पगार थांबवले जातील. प्रशासनिक खर्च पुढे ढकलला जाईल.
सार्वजनिक ठिकाणे- स्मिथसोनियन संग्रहालय आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय सारखी ठिकाणे बंद असू शकतात.
शिक्षण आणि कर्ज सेवा: विद्यार्थी कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
सरकारी बंद म्हणजे काय?
जेव्हा फेडरल सरकार चालवण्यासाठी लागणारा निधी संपतो तेव्हा सरकारी शटडाउन होते. जर यूएस काँग्रेस (संसदेने) निधी विधेयक मंजूर केले नाही, तर अनेक सरकारी सेवा ठप्प होतील, त्याचा सर्वसामान्यांना त्रास होईल.
यापूर्वी अमेरिकेत ट्रम्प यांच्या कार्यकाळात 35 दिवस सरकारी शटडाऊन होते. त्यावेळी सुमारे 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पगाराशिवाय काम केले होते.