अमेरिकेवर 33 ट्रिलियनचं कर्ज, खर्चाला निधी देणारं विधेयक पारित न झाल्यास १ तारखेपासून शटडाऊन?

  • Written By: Published:
अमेरिकेवर 33 ट्रिलियनचं कर्ज, खर्चाला निधी देणारं विधेयक पारित न झाल्यास १ तारखेपासून शटडाऊन?

American Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यववस्था असलेलेल्या अमेरिकेत (america) येत्या काही दिवसांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच अमेरिकेत शटडाऊनचा धोका वाढला आहे. शटडाऊन (shutdown) सुरू व्हायला फक्त दोन दिवस उरले आहेत. वास्तविक, सरकारला निधी देणारे फेडरल सांघिक आर्थिक वर्ष 30 सप्टेंबरला संपतेय. आणि त्यापूर्वी सरकारला विरोधकांची संमती घेऊन निधीची खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर करणं गरजेच आहे. अन्यथा 1 तारखेपासून शटडाऊन सुरू होऊ शकतं. परिणामी, अमेरिकेसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.

30 सप्टेंबरपर्यंत विधेयक मंजूर करणं गरजेचं
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सरकारी खर्चाचे विधेयक 30 सप्टेंबरपर्यंत मंजूर न केल्यास सरकारला ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागू शकते. शटडाऊन लागू झाल्यास, अत्यावश्यक सेवा कर्मचारी कामावर राहू शकतात. मात्र, शटडाऊन असेपर्यंत त्यांना पगार मिळणार नाही. थोडक्यात काय तर कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, योजनांना टाळे लागणार आणि लोकांना जीवनावश्यक गोष्टींसाठीही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शटडाऊनची परिस्थिती का?
अमेरिकेत शटडाऊन म्हणजे तिथे सर्व प्रकारची सरकारी कामे ठप्प होतील. यामागचे कारण म्हणजे या कामांसाठी सरकार आपल्या महत्त्वाच्या योजना सुरू ठेवण्यासाठी कर्जाच्या रूपाने आवश्यक असलेले पैसे घेते. या कर्जासाठी अमेरिकन संसदेची म्हणजेच मंजुरी आवश्यक आहे. पण इथे अडचण अशी आहे की संसदेकडे मंजुरीसाठी पोहोचण्यापूर्वी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजेच डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यात परस्पर संमती आवश्यक आहे. सहसा, निधीची आर्थिक स्थिती संपेपर्यंत, दोघांमध्ये करार केला जातो, परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! नगरकरांनी जड अंतःकरणाने विशाल गणपतीला दिला निरोप

निधी आराखडा मंजूर होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असून यावेळी देशात राजकारण शिगेला पोहोचले आहे. रिपब्लिकन पक्ष आडमुठेपणाची भूमिका ठेऊन काही सरकारी योजना आणि खर्चांवर आक्षेप घेत आहे. यासोबतच अमेरिकेच्या सततच्या वाढत्या कर्जाचा हवाला देत विरोधक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशा स्थितीत यावेळी निधी आराखड्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एकमत झालं नाहीतर 1 ऑक्टोबरपासून देशाला शटडाऊनला सामोरे जावे लागू शकते.

ट्रम्प यांच्याकडून शट डाऊनचे समर्थन?
सध्याच्या स्थितीत अमेरिकेत शटडाऊन झाल्यास त्याचा संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे विपरीत परिणाम होऊ शकतो. म माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शटडाऊनचे जाहीर समर्थन केले आहे.

अमेरिकेत बाँडचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे आणि गृहकर्जाचा सरासरी दर 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनावश्यक अशा लोककल्याणकारी योजना बंद करून खर्च कमी करायला हवा, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिका ३३ ट्रिलियन कर्जाखाली दबली
जर अमेरिकेत शटडाऊन झाला तर आधीच बँकिंग संकट आणि इतर आव्हानांच्या भोवऱ्यात अडकलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तो मोठा धक्का असेल. अमेरिकेचे एकूण कर्ज (Debt On US) 33 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. एका तिमाहीत त्यात 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी कामकाज बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. विरोधी पक्षही सतत म्हणत आहे की सरकारचे कर्ज खूप जास्त आहे आणि ते देशाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. इतके कर्ज घेऊन पुढे जाणे भविष्यात अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करतो.

33 लाख कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार
अमेरिकेत शटडाऊन झाल्यास सरकारला तेथील कर्मचाऱ्यांना पगार देणंही कठीण होणार आहे. शासकीय कामे ठप्प झाल्याने अनेक योजना ठप्प होतील. याचा परिणाम देशातील अंदाजे 33 लाख कर्मचाऱ्यांवर होणार असून त्यांचे पगार थांबणार आहेत. यापैकी सुमारे 20 लाख नागरी सेवा कर्मचारी आणि 13 लाख संरक्षण कर्मचारी प्रभावित होतील. दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, परंतु नवीन योजना स्थगित ठेवल्या जातील. त्यामुळे महागाईचा चटका सोसणाऱ्या देशातील जनतेवरचा बोजा आणखी वाढणार आहे. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेतील शटडाऊनचा परिणाम जगातील अनेक देशांमध्येही दिसून येतो.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube