मी शिंदेंना सांगत होतो तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल; बच्चू कडू
Bacchu Kadu News : विधानसभेच्या निकालानंतर (Assembly Election) अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. एकीकडे भाजपकडे 132 जागा मिळाल्या तरीही अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय नाही. महायुतीची एकहाती सत्ता आली तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. अशातच मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने भाजपचा मार्ग सुकर झालायं. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलंय. मी एकनाथ शिंदेंना सांगत होतो, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.
‘त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते’, श्रीकांत शिंदेंच्या DCM पदाच्या चर्चेंवरून शिंदे गटाचा टोला…
बच्चू कडू म्हणाले, मी एकनाथ शिंदेंना सांगत होतो की, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, कारण एकनाथ शिंदे हे एक मात्र मुख्यमंत्री होते जे दोन वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटत होते. त्यामुळे भाजपाला वाटले होते की शिंदेंना थोडं दाबून ठेवू. सत्तेत असताना ते दाबू शकले नाहीत, त्यांचे काम बोलत होते, त्यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता कारण भाजपला एक हाती सत्ता घ्यायची असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.
शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार! दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार…
एकनाथ शिंदे नाराज नसते, फुटले नसते तर सत्ता आली नसती. सत्तेमुळे आज जो घोटाळा करता आला तो शिंदे यांचे पायथ्यावर पडला. भाजपने एक चांगले काम केले की, राज्यातले विरोधी पक्ष संपवण्याचे काम केले, मित्र पक्षाची तानातानी सुरू केली असून तुम्हारे सिवा भी सरकार बन सकती है, अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली त्यामुळे गरज सरो वैद्य मरो हा भाजपचा धर्म असल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केलीयं.
श्रीकांत शिंदे पोहोचले, केसरकर माघारी फिरले; एकनाथ शिंदेंच्या गावात नेमकं काय घडतंय?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार…
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना फोन करुन तुम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचं मला वाटत आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोणीही होऊ दे त्यांनी म्हटले होते की, कर्ज माफ करू आता वाट पाहू , होऊ द्या आता मुख्यमंत्री, असंही कडू म्हणाले आहेत.