शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार! दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार…
Shikarpur Crime: दिवसेंदिवस राज्यात गुन्हेगारीच्या घटनात वाढ होऊ लागली आहे. आज पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये (Shikarpur) दिवसा ढवळ्या खुनाची घटना घडल्याची घडली. शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (Dattatraya Bandu Gilbile) यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यांच्या घराजवळ ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…
दत्तात्रय बंडू गिलबिले (वय 52) यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे शिक्रापूर येथील त्यांच्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसून होते. त्याचवेळी काही अज्ञात आरोपींनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले. यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त आहे.
शरद पवारांचाही प्रतोद, गटनेता ठरला; रोहित पाटील अन् जितेंद्र आव्हाडांवर दिली जबाबदारी
दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गिलबिले यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. भर दिवसा गिलबिले यांच्या हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्रापूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांची नावे आणि संख्या समोर आली नाही. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. तसेच या घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस करत असून लवकरात लवकर आरोपींना अटक करू, असं पोलीस प्रशासनाने सांगितलं.