शरद पवारांचाही प्रतोद, गटनेता ठरला; रोहित पाटील अन् जितेंद्र आव्हाडांवर दिली जबाबदारी

शरद पवारांचाही प्रतोद, गटनेता ठरला; रोहित पाटील अन् जितेंद्र आव्हाडांवर दिली जबाबदारी

Sharad Pawar Ncp : उद्धव ठाकरे गटानंतर शरद पवार गटाकडूनही (Sharad Pawar Ncp) आता मुख्य प्रतोद आणि गटनेतेपदाची घोषणा करण्यात आलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील (Rohit Pawar) तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर यांची नियुक्ती करण्यात आलीयं. तर गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं. तर विधिमंडळ नेत्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी ईव्हिएमच्या मुद्द्यावरुनही आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

अजितदादांनी निवडणूक जिंकली, मात्र पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात

जयंत पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 5 वाजेनंतर 8 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढले आहे, हे अचानक वाढलेले मतदान सवाल उपस्थित करीत असून निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे. राज्यात आमची संख्या कमी तरीही आम्ही धडाडीने लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचं जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद करण्यात आली होती. हे चूक असून माहिती दडपण्याचा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केलायं.

राज्याच विधानसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागला आहे. त्यानूसार आता राज्याच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी जनतेचे कोणतेही प्रश्न प्रलंबित ठेऊ नये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतील की नाही, याबाबत माहिती नाही मात्र, ते मुख्यमंत्री झाल्यास त्यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, कारण त्यांच्या म्हणण्यानूसार जनतेने त्यांना मते दिली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला विजय मिळतो यावर आमचाच नाही तर अनेकांचा विश्वास बसत नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube