Neal Katyal : नडले, भिडले अन् विजयी झाले; भारतीय वंशाच्या वकिलाने ट्रम्प सरकारला घाम फोडला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या कोर्टाने अत्यंत मोठा दणका दिला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टॅरिफची डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घेत नाही.

  • Written By: Published:

Who is Indian American lawyer Neal Katyal challenges donald trump tariffs : टॅरिफ प्रकरणावरून अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प सरकारला मोठा धक्का दिला असून, कोर्टात भारतीय वकिलाने केलेल्या युक्तीवादात ट्रम्प सरकारचा प्रत्येक युक्तीवाद अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या वकिलाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. कोर्टात ट्रम्प सरकारला घाम फोडणारे नील कत्याल नेमके कोण? त्याबद्दल जाणूनन घेऊया…

कोर्टात नेमकं काय घडलं?

टॅरिफ प्रकरण ज्यावेळी कोर्टात मांडण्याची वेळ आली त्याआधी या महत्वाच्या विषयावर युक्तिवाद करण्यासाठी वकिलांमध्ये कॉईन उडवण्यात आला आणि त्यावरून ठरले की, हा जागतिक विषय अमेरिकेच्या कोर्टात नील कत्याल मांडणार. युक्तीवादाला ज्यावेळी सुरूवात झाली त्यावेळी  नील यांनी म्हटले की, अध्यक्षांना नक्की शक्तीशाली अधिकार आहेत. मात्र, आपले संविधान त्याहून अधिक शक्तिशाली आहे. त्यानंतर युक्तीवादात नील यांचे युक्तिवाद ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला रोखू शकले नाही आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प सरकारने लादलेले शुल्क चुकीचे असल्याचे सांगत ते रद्दपातल करण्याचा ऐतिहासिक निकाल दिला.

1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा (IEEPA) वापर करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानीपणे शुल्क लादणे हे केवळ अन्याय्यच नाही तर, असंवैधानिक देखील असल्याचे कत्याल यांनी कोर्टात सांगितले. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या शुल्कामुळे देशाच्या व्यापार धोरणाला झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती दिली. शिवाय, ट्रम्प यांच्या शुल्कामुळे इतर देशांशी असलेल्या ताणलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकला.

नील कात्याल कोण आहे?

नील कत्याल याचे आई वडील भारतातून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. नील यांचे वडील इंजिनिअर तर आई पेशाने डॉक्टर आहे. येल लॉ स्कूलमधून पदवी मिळून अनेक वर्ष त्यांनी कोर्टात नोकरी केली आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संवैधानिक बाबींशी संबंधित खटल्यांमधून स्वतःची कारकीर्द घडवली आहे. 2010 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कार्यवाहक सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केलेल्या कत्याल यांनी सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील अपीलीय न्यायालयांसमोर संघीय सरकारचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात 50 हून अधिक खटले लढवले आहेत, जे अल्पसंख्याक वकिलांसाठी एक विक्रम आहे. 2011 मध्ये त्यांना न्याय विभागाचा सर्वोच्च नागरी सन्मान एडमंड रँडॉल्फ पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांची 2017 आणि 2023 मध्ये वर्षातील सर्वोत्तम वकील म्हणूनही निवडण्यात आले होते.

’कलम 122 ‘चा अस्त्र म्हणून वापर

​सर्वोच्च न्यायालयाने जुने टॅरिफ रद्दबातल ठरविले असले, तरी ट्रम्प यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. 1974 च्या ‘व्यापार कायद्या’तील कलम 122 चा वापर करून सर्व आयातीवर पुन्हा एकदा 10 टक्के जागतिक टेरिफ लागू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या कलमांतर्गत अध्यक्षांना 150 दिवसांसाठी तात्पुरते शुल्क लावण्याचे विशेष अधिकार आहेत. “आम्ही हे शुल्क पुन्हा लावू आणि यावर संसदेची मंजुरी मिळवू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांच्या या निर्णयाला आता अमेरिकी संसदेत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “आम्ही मागे हटणार नाही, ‘अमेरिका प्रथम’ (America First) हेच आमचे धोरण राहील,” असे सांगत ट्रम्प यांनी आगामी काळात ‘व्यापार युद्ध’ अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत.

follow us