नायगावमध्ये शरद पवार गटाच्या नेत्याची बंडखोरी; काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता
Shirish Gorthekar Independent Candidate From Naigaon :
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर (Maharashtra Assembly Election 2024) आहे. त्यामुळे राज्यात किती जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल (congress) केलाय. त्यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे मात्र कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीकडून नायगाव मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्षाला सुटली. या जागेवर शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर ( Shirish Gorthekar) इच्छूक होते. परंतु कॉंग्रेसला जागा गेल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. शिरीष गोरठेकर यांनी समर्थकांची बैठक घेऊन विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोठरेकर (Sharad Pawar) यांच्या बंडामुळं नायगाव मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, ‘तुतारी’ बाबत मोठा निर्णय
शिरीष गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र आहेत. नायगाव मतदारसंघामध्ये गोरठेकर यांची मोठी ताकद आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोरठेकर यांनी उमेदवारी मागितली होती. पण हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेसला सुटला. काँग्रेसने मिनल खतगावकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळं गोरठेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता.
शिरीष गोरठेकर माघार घेतील, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षा होती. परंतु त्यांनी समर्थकांची बैठक घेवून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार, असं चित्र आहे. शिरीष गोरठेकर यांच्या बंडामुळे नायगाव विधानसभा आणि लोकसभेमध्ये देखील काँग्रेसला फटका बसू शकतो.