Congress Announced Fourth list : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पंढरपूर अन् अंधेरीत ट्विस्ट

  • Written By: Published:
Congress Announced Fourth list : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पंढरपूर अन् अंधेरीत ट्विस्ट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी जाहीर केलेल्या नावात बदल केला आहे. (Vidhan Sabha) याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sixth candidate list of MNS: मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई, ठाण्यातही दिले तगडे उमेदवार

अंधेरी पश्चिम येथे आधी काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे आता काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. वरोरामधून प्रवीण काकडे यांना तिकिट जाहीर केलं आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे 

अमळनेर -अनिल शिंदे
उमरेड – संजय मेश्राम
अरमोरी- रामदास मसराम
चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग रावत
वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार
औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
पंढरपूर – भगिरथ भालके
सोलापूर दक्षिण- दिलीप माने
शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube