Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी राहुल गांधी ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांसोबत करणार मिटिंग
Rahul Gandhi : पुढील काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच कामाला लागले आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांची तातडीने मिटिंग बोलावली आहे.
या मिटिंगमध्ये विधानसभेसाठी रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 14 ऑक्टोबर रोजी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची मिटिंग बोलावली आहे.
या बैठकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) , विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) तसेच विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) मिटिंगमध्ये उपस्थित राहणार आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सहज विजय मिळणार आणि भाजपला धक्का देत 10 वर्षानंतर सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती मात्र भाजपने (BJP) हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्याने महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का मनाला जात आहे. त्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोड आले असून उद्या राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत आगामी विधानसभेसाठी रणनीती ठरवली जाणार आहे.
Ola वर केंद्राची मोठी कारवाई, रिफंड प्रक्रियेसाठी नियमांमध्ये करावे लागणार बदल
या मिटिंगमध्ये जागावाटपाबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला होता तर भाजपने 48 जागांवर विजय मिळावला होता.