जम्मूच्या लोकांना धन्यवाद अन् हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे..,; निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

जम्मूच्या लोकांना धन्यवाद अन् हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे..,; निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi News : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता तर हरियाणात पुन्हा भाजपने बाजी मारलीय. काँग्रसेला हरियाणात जेमतेम 38 जागा मिळाल्या आहेत. या निकालावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीयं. जम्मू काश्मीरच्या लोकांचं धन्यवाद आणि हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला 6 जागा मिळाल्या असून नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 29 जागा मिळाल्या आहेत. तर हरियाणामध्ये भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत सत्ता कायम राखलीयं. हरियाणात भाजपला 48 तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या आहेत.

‘हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी पाहिजेच’; पुण्यातील मतदारसंघावर शिवसेनेचा दावा पक्का..

राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरमधील जनतेचे आभार मानले, जिथे त्यांनी “इंडिया”च्या विजयाला संविधानाची आणि लोकशाहीच्या अभिमानाची विजय मानले. त्यांनी उल्लेख केला की, हरियाणामध्ये झालेल्या अप्रत्याशित निकालांचे विश्लेषण करण्यात आले जात आहे आणि अनेक विधानसभा क्षेत्रांमधून आलेल्या तक्रारींबाबत निवडणूक आयोगाला कळवले जाईल.

जयराम रमेश यांचा गंभीर आरोप…
हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवला जात आहे. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube