“..म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला”, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!

“..म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला”, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!

Rahul Gandhi Speech in Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना (Chhatrapati Shivaji Maharaj) सोबत घेण्याचा संदेश दिला. देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. भारताचं संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत. परंतु, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिसत नाही. महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. त्या लोकांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातून अनावरण करण्यात आलेला पुतळा पडला. त्यांनी राम मंदिर आणि संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि (PM Narendra Modi) भाजपवर टीका केली.

राहुल गांधी आज कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली. यावेळी काँग्रेसचे (Congress Party) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील आदींसह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

अन् राहुल गांधींनी मागितली माफी

राहुल गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच उपस्थितांची माफी मागितली. मी तुमची माफी मागतो. काल संध्याकाळी कार्यक्रम होणार होता. पण विमानात तांत्रिक बिघाडामुळे आज हा कार्यक्रम होत आहे. भारतात आज दोन विचारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तर दुसरी विचारधारा संविधान संपविण्याची भाषा करणाऱ्यांची आहे. राम मंदिर असो की नवीन संसद भवनाचं उद्घाटन असो आदिवासी राष्ट्रपतींना येऊ दिलं नाही. म्हणून ही विचारधारेची आणि संविधानाची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला आहे की हा देश सर्वांचा आहे. येथे कुणावरही अन्याय होता कामा नये. महाराजांच्या विचारांचच प्रतिबंब आपल्याला संविधानात दिसून येत आहे. महाराजांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानातील तरतुदी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतूनच आल्या आहेत असेही राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

Video : कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube