अजितदादांनी निवडणूक जिंकली, मात्र पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात

  • Written By: Published:
अजितदादांनी निवडणूक जिंकली, मात्र पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात

Yugendra Pawar : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केल्या आहेत. तर, काही उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. (Yugendra Pawar) युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. त्यामध्ये त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. पुण्यातील 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 व काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.

पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी

लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूध्द पवार अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघारडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.

या नेत्यांना केला मत पडताळणीसाठी अर्ज

पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे.

संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांच्या यंत्रांची पुन्हा पडताळणी केली जाते. ही यंत्रे उमेदवाराकडून सांगितली जातात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 41 हजार 500 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये शुल्क आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube