Yugendra Pawar: तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता, पहिल्या सभेत युगेंद्र पवार काय म्हणाले?
Baramati Assembly Election 2024 : लोकसभेला वाटत होतं घासून होईल परंतु तसं झालं नाही. बारामतीचे नाव हे जगात मोठं केलं ते शरद पवार यांनी केलं आहे. मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासून बारामती ही शरद पवार यांच्या नावाने ओळखतात.शरद पवार साहेब माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. मी सर्व बारामतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. असं युगेंद्र पवार म्हणाले. ते आयोजीत प्रचारसभेत बोलत होते.
दादा भुसेंच्या गुंडांकडून ठाकरे गटाच्या अद्वय हिरेंवर हल्ला; खासदार संजय राऊतांनी केला गंभीर आरोप
माझे आदर्श हे फक्त पवार साहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात. त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधीही शरद पवार यांना सोडणार नाही. पवारसाहेब नेहमी जनतेचा विचार करतात. म्हणून बारामती कर त्यांच्यामागे ठाम उभं राहतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी शरद पवार यांनी केली. जगातला सर्वात निर्यातदार देश आपण झालो. ही बाब फक्त शरद पवार यांच्यामुळे शक्य झालं आहे असंही ते यावेळी म्हणाले.
आताची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकसभेत यश नाही मिळालं म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. दोन महिने ही योजना चालवली आणि आता बंद केली. 100 रुपयांचा स्टॅम्प 500 रुपयाला नेला. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत, असं म्हणत युगेंद्र पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.