पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी
Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदार संघातील उमेदवार संदीप वर्पे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले आहेत.
तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वर्पे (Sandip Varpe) यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुजय विखे यांनी देखील असाच फेर मतमोजीणीसाठी अर्ज दाखल केला होता.
आश्चर्यच! ‘या’ देशात १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मिडियाच बंद; कायदाच येतोय..
दरम्यान लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना ईव्हीएम (EVM) पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहे. तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज करता (Maharashtra Politics) येतो, तशी मागणी करता येते. दरम्यान निकाल लागल्यानंतर 45 दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना शुल्क भरावे लागत असते.
भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी; महाराष्ट्रासाठी नवं नाव..
तनपुरे व वर्पे यांनी शुल्क भरत केली पडताळणीची मागणी
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाला. राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळविले. उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. फेर पडताळणीसाठी एका मतदान केंद्रासाठी तब्बल 47 हजार दोनशे रूपये शुल्क आकारले जाते. त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी 47 हजार दोनशे रूपये असे, पाच केंद्राचे एकूण 2 लाख 36 हजार रूपये शुल्क भरले आहे.
तसेच कोपरगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळालेले उमेदवार संदीप वर्पे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी 47 हजार दोनशे रूपये शुल्क प्रशासनाकडे भरले आहे.