भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी; महाराष्ट्रासाठी नवं नाव..

भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी; महाराष्ट्रासाठी नवं नाव..

Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच महाराष्ट्राच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीव दमण दादरा नगर हवेली या भागाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करतात?; तावडेंनी वाटचाल सांगत उघड केले पत्ते 

राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि प्रदेश भाजप यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुनील बन्सल यांनी पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड आणि हरियाणा राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तरुण चुग यांना केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीप, शिवप्रकाश यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांची तर राधामोहन दास यांना राजस्थान, पंजाब, चंदीगड आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

साधारण जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीनंतर पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकांच्या दृष्टीनेच पक्षातील नेत्यांना काही राज्यांत निरीक्षक म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही दोन मोठ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये तर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत.

मोठी बातमी! माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या; अन्यथा..विनोद तावडेंची काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांना नोटीस

शहा-तावडेंची खलबतं

एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु, बिगर मराठा चेहरा दिल्यास याचा मराठा मतांवर परिणाम काय परिणाम होऊ शकतो याची चाचपणी तावडे आणि शहा यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. परंतु तरीही जर फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घ्यायचाच असेल तर मराठा मतं कशी टिकवता येतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube