विकासकामांमुळे वळसे-पाटलांना मोठं मताधिक्य मिळेल : विष्णू काका हिंगे

  • Written By: Published:
विकासकामांमुळे वळसे-पाटलांना मोठं मताधिक्य मिळेल : विष्णू काका हिंगे

अवसरी : विकासकामांच्या जोरावर आंबेगाव तालुक्यात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठं मताधिक्य मिळेस असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी व्यक्त केले. ते पोंदेवाडी येथील कोपरा सभेत बोलत होते.
हिंगे म्हणाले की, सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी गेल्या 35 वर्षांत विकासाची गंगा तालुक्यात आणून विकास काय असतो हे दाखवून दिले आहे. तर, दुसरीकडे विरोधी उमेदवाराकडे टीका करणे हेच काम आहे. विकासाच्या जोरावरच येथील मतदार वळसे पाटलांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करतील असा विश्वासही हिंगे यांनी व्यक्त केला. यावेळी, विवेक वळसे- पाटील, अनिल वाळुंज, भगवान वाघ आदी
उपस्थित होते.

विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात

अनेक विकास कामं मार्गी

वळसे पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत डिंभे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे धरणाच्या उजव्या, डाव्या कालव्याची निर्मिती होऊन तालुक्यातील गावागावांत शेतीला पाणी मिळाले. तर नव्याने अवसरी फाटा ते पारगाव पिंपरखेड मार्गे जांबुत शिक्रापूर हा 67 किलोमीटर नवीन रस्त्याकरिता 416 कोटी रुपये मंजूर झाले असून, थोड्याच दिवसात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही

घरोघरी वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न, दळणवळणासाठी तसेच वाहतूक प्रवासी वाहतूक जलद गतीने व्हावी म्हणून बेल्हा ते जेजुरी रस्ता, अष्टविनायक रस्त्याची कामे पूर्ण झाली असल्याचे हिंगे म्हणाले. अवसरी खुर्द तांबडे मळा येथे पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो चालू केला आहे. काठापुर, पिंपळगाव, अवसरी बुद्रुक, पेठ येथे विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशन उपकेंद्र उभारले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube