विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात
अवसरी : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारखी जस-जशी जवळ येऊ लागली आहे. तसं-तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. समोरील विरोधकांकडे टीका, टिप्पणी, निंदा अन् नालस्ती यांच्या शिवायकाहीच नाहीये. कारण त्यांच्याकडे लोकांसाठी काय केलं हे सांगयला काही भांडवल नाही. ते पारगाव येथील प्रचार सभेत बोलत होते. (Dilip Walse Patil Attack On Ppposition Leader)
“शरद पवार प्रगल्भ नेते पण, त्यांनी माझी नक्कल करणं..”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
विरोधकांचा विकासाला विरोध
वळसे पाटील म्हणाले की, विरोधक विकासाला विरोध करत असून, त्यांनी आपल्या कामाचे सिंहावलोकन करण्याची गरज आहे. परंतु, निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
भीमाशंकरमुळे रोजगाराला चालना
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, पारगाव परिसरात वीस वर्षांपूर्वी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काढायचे ठरले. त्यानंतर अल्पावधीत हा कारखाना उभा राहिला. या कारखान्यामुळे सुमारे सहाशे तरुणांना रोजगाराची संधी मिळाली. या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, व्यावसायिकांनादेखील फायदा झाला. तालुक्यातील डिंभे धरणाला बोगदा पाडून ते पाणी नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड परिसरात पळवून नेण्याचा विरोधकांचा दाव अससल्याचे वळसे-पाटील म्हणाले.
या परिसरात बेल्हा रांजणगाव गणपती अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण झाले. आता बेल्ह्यापासून, लाखणगाव, अवसरी खुर्द, गायमुख, पारगाव, पिंपरखेड, मलठण, टाकळी हाजी गणेगाव, शिक्रापूर अशा ६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला ४१६ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विष्णू हिंगे, अरुण गिरे, विवेक वळसे पाटील, अजय आवटे, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, शैलजा ढोबळे, दौलत लोखंडे, रामचंद्र ढोबळे, अजित चव्हाण, बाळासाहेब घुले, ज्ञानेश्वर लोखंडे, रामहरी पोंदे, प्रियंका लोखंडे, विठ्ठल ढोबळे, सुगंध पोंदे, प्रज्ञा कुलकर्णी आदी उपस्थित होते.