श्रीकांत शिंदे पोहोचले, केसरकर माघारी फिरले; एकनाथ शिंदेंच्या गावात नेमकं काय घडतंय?

श्रीकांत शिंदे पोहोचले, केसरकर माघारी फिरले; एकनाथ शिंदेंच्या गावात नेमकं काय घडतंय?

Eknath Shinde Health Update News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालाला आता आठ दिवस होऊन गेलेत तरीही अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण होतं, त्यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दरेगावी असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील दरेगावी पोहोचले आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) दरेगावी पोहोचले होते. परंतु ते देखील एकनात शिंदे यांना न भेटता गेटवरूनच माघारी परतले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांणा मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. दरम्यान एकनाथ शिंदे दीपक केसरकर यांना का भेटले नाहीत? दीपक केसरकर कोणाचा निरोप घेवून आले होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

CM पदाच्या चर्चेत नवा ट्विस्ट! भाजपाच्या ‘या’ आमदाराच्या नावाची अचानक चर्चा

आता मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आता पुन्हा माघारी परतणार आहेत. एकनाथ शिंदे (Maharashtra CM) यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती मिळतेय. खासदार श्रीकांत शिंदे देखील रात्री दरे येथे दाखल झालेत. आज शिंदे मुंबईला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दरे गावातून पुन्हा मुंबईला परतल्यानंतर सत्तेची कोंडी सुटणार का? असा देखील प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

इंटरनेट अन् स्मार्टफोन वापरताय मग दर तासाला स्क्रीनशॉटही द्या; ‘या’ देशांत इंटरनेटचा वापर कठीणच!

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच एकनाथ शिंदे अचानक गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे काल घराबाहेर देखील पडले नाहीत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील त्यांनी टाळल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन गावाला निघून गेलेत. त्यांच्या गावात कोणती देवी आहे? असा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube