‘गरज सरो, वैद्य मरो, भाजपने लाडक्या भावाकडे दुर्लक्ष…; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच बच्चू कडूंचे विधान

  • Written By: Published:
‘गरज सरो, वैद्य मरो, भाजपने लाडक्या भावाकडे दुर्लक्ष…; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच बच्चू कडूंचे विधान

Bachchu Kadu : महायुतीत (Mahayuti) मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषदेत घेत भाजपला (BJP) पाठींबा जारी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह (Amit Shah) मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील, तो प्रत्येक निर्णय मान्य असेल, असं शिंदेंनी जाहीर केलं. मात्र, तरीही महायुतीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपबाबत मोठे वक्तव्य केलं.

आमच्यात मतभेद नाहीत, निर्णय सोबत बसूनच होईल; फडणवीसांनी क्लिअर केलं… 

भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता, असं ते म्हणाले.

बच्चू कडू यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सरो, वैद्य मरो हा असा अजेंडा वापरू नये. जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता. तसेच आजचे चित्र वेगळे असतं. त्यामुळे ही किमया आहे, ती सर्व एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आहे. शिंदे यांनी बंड केले नसते तर लाडक्या बहिण योजना देखील आली नसती. त्यामुळं ज्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना शोधून काढली. त्या भावाकडे दुर्लक्ष करू नाही, सीएमपदावर शिंदेंचीच दावेदारी योग्य आहे, असं कडू म्हणाले.

Maharashtra Politics : तुम्ही मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांना पत्रकारांना जोडले हात, ‘तिन्ही पक्ष…’ 

झेंडे जिंकले, सेवा हरली
पुढं ते म्हणाले की, या निवडणुकीत जात नव्हे तर धर्माचा फॅक्टर महत्वाचा ठरला. धर्माचा झेंडा जिंकला असून आमच्या सेवेचा झेंडा हरल्याचं ते म्हणाले. झेंडे जिंकले, सेवा हरली… कोणत्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे. मात्र ईव्हीएममध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जगातील सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होत असताना भाजप बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं का म्हणत नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

शिंदेंची तलवार म्यान…
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीच्यचा विजयानंतर शिंदे सेनेने गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत सीएमपदावर दावा ठोकला होता. मात्र, फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची भाजपची खेळी पाहून शिंदे यांनी माघार घेतली. भाजपचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीत जो काही निर्णय घेईल, तो निर्णय मला आणि शिवसेनेला मान्य असेल, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube