भाजपचा पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धमाका; आमदाराच्या मुलासह 22 नेते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार

पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक स्थानिक दिग्गज नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.

  • Written By: Published:
Mahapalika Election 2025 Pune And Pimpri Bjp

Mahapalika Elections 2025: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Mahapalika Elections 2025) पार्श्वभूमीवर पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक स्थानिक दिग्गज नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.मुंबईत उद्या शनिवारी (20 डिसेंबरला) हे प्रवेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाचे सर्वाधिक स्थानिक नेते, माजी नगरसेवक यामध्ये आहेत. शरद पवार गटाच्या आमदारांच्या मुलानेही भाजपची वाट धरलीय. राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस, उबाठाचे काही जण यात आहे. ही यादी थोडीथिडके नाहीतर तब्बल 22 जणांची आहे. त्यामुळे भाजपने विरोधी पक्षांना सुरुंगच लावला आहे.

काही दिग्गज नेत्यांचा मुंबईत भाजप प्रवेश होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची यादीत समोर आलीय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे(Rahul kalate), वडगाव शेरीचे आमदार बापू पठारेंचे (Bapu Pathare) चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट, उबाठाचे संजोग वाघेरे काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल व सध्या राष्ट्रवादीत नसलेले विकास दांगट यांचा समावेश आहे. (mahapalika-elections-2025-ncp-congress-pune-local-leader-will-join-bjp)


स्वबळासाठी भाजपने ताकद वाढविली

पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी भाजप व शिवसेना अशी युती झाली आहे. तर अजित पवारांचे राष्ट्रवादीत या युतीत नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दोन्ही ठिकाणी ताकद जास्त नाही. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळू शकतात. त्यात भाजपविरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. दोन्ही ठिकाणी स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणखी आपली ताकद वाढवत आहेत. भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेसचे स्थानिक नेते नको आहोत


विरोध असूनही प्रवेश होणार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेसचे आणखी नेते पक्षात नको, असा विरोध भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी केला होता. विशेष करून राहुल कलाटे यांना पक्षात घेऊन असा विरोध पिंपरी-चिंचवडमधून होत आहे. आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून कलाटे यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचे बोलले जात आहे. परंतु स्थानिक विरोध अंगावर घेऊन भाजपमध्ये या नेत्यांचा प्रवेश शनिवारी होणार आहे.

follow us