Haldwani Violence : हल्द्वानी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू; इंटरनेट ठप्प, शाळा-दुकानेही बंद

Haldwani Violence : हल्द्वानी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू; इंटरनेट ठप्प, शाळा-दुकानेही बंद

Haldwani Violence News : उत्तराखंडातील हल्द्वानी जिल्ह्यातील बनभूलपुरा येथे (Haldwani Violence) काल अवैध अतिक्रमण हटवण्यावरून जोरदार धुमश्चक्री उडाली. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या वाहनांन आग लावली. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी प्रशासनाने सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेले धार्मिक स्थळ बुलडोझरच्या मदतीने हटवले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत पोलिसांवर तुफान  (Haldwani Riots) दगडफेक केली. काही वेळात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घालत त्याला आग लावली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जमावाने थेट सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवरच हल्ला केल्याने सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

भाजपशासित राज्याचं समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल, मसुद्यात नेमंक काय?

या तणावाच्या परिस्थितीमुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. जखमींमध्ये पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानंतर आता प्रशासनाने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका आयु्क्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले, की संबंधित धार्मिक स्थळाची जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. म्हणून ही जागा सील करण्यात आली होती. आता या जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले आहे. या कारवाईचा निषेध म्हणून काही समाजकंटकांनी दगडफेक केली. या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे.

समान नागरी कायद्याचा मसुदा तयार, ‘या’ राज्यात पहिल्यांदा लागू होणार; काय आहेत तरतूदी?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube