Latur Crime : शेती विकण्यावरून वाद! मुलाने केला आईचा गळा आवळून खून, नंतर स्वत:ला संपवलं

Son Killed Mother In Latur : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे आई–मुलाच्या नात्याला (Son Killed Mother) काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या खर्चासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी, असा मुलाचा आग्रह आईने नाकारला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून खून केला (Latur) आणि मृतदेह उसाच्या शेतात पुरला. काही वेळातच तो स्वतःही गळफास घेऊन (Latur Crime)मृत झाला. या दुहेरी मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.
आईचा गळा आवळून खून
मृत आरोपी मुलाचे नाव काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय 48) असे आहे. त्याच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. चार बहिणींनंतर जन्मलेला तो एकुलता एक मुलगा (Dispute Over Selling Farm) होता. त्याला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. तीन महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीचे लग्न करण्यात आले. या लग्नात झालेलं कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित थोडीशी शेती विकावी, असा सल्ला काकासाहेब यांनी त्यांच्या 70 वर्षीय आई समिंदराबाई वेणुनाथ जाधव यांना दिला. मात्र, पतीच्या निधनानंतर मी जमीन विकणार नाही, असे स्पष्ट सांगत आईने मुलाच्या प्रस्तावाला नकार दिला.
मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र! राऊतांचं सूचक विधान, मविआची समीकरणं बदलणार?
घटनेचा उलगडा
आईच्या नकारामुळे संतप्त झालेल्या काकासाहेब यांनी तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात भरून उसाच्या शेतातील खड्ड्यात पुरला. यानंतर तो शेतापासून सुमारे आठ किलोमीटर दूर गेला आणि बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणापूर फाटा परिसरातील मोकळ्या जागेत एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशीत मृत व्यक्ती काकासाहेब जाधव असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या आई अन् पत्नी घरातून गायब असल्याचे लक्षात आले.
चर्चेअंती एकमत! गणेश विसर्जनाच्या वादात ‘पुणेकरांचा अनुभव’ दांडगा, CM फडणवीसांचा विश्वास
शोध घेताना उसाच्या फडात माती उखरल्याचा संशय आल्याने खोदकाम करण्यात आले. त्यातून एक पोते सापडले, त्यात केस दिसल्याने ते बाहेर काढण्यात आले. पोत्यात समिंदराबाई जाधव यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.