विधिमंडळात हाणामारी करणारा पडळकरांचा शिलेदार ‘झोपडपट्टी दादा’; ऋषी टकलेची कुंडली घ्या जाणून…

Padalkar Awhad Clashes Who Is Rishi Takle Of Sangli : विधानभवन परिसरात काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील तणाव शिगेला (Vidhan Bhavan Rada) पोहोचला. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की अन् मारहाणीची घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वपक्षीयांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध (Rishi Takle) नोंदवला आहे.
विधानभवनात पडळकर-आव्हाड समर्थकांत राडा
विशेष म्हणजे, या हाणामारीत सहभागी असलेला ऋषी ऊर्फ सर्जेराव बबन टकले (रा. माळवाडी, जि. सांगली) हा व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्यात त्याच्यावर खुनी हल्ला, विनयभंग, सरकारी कामात अडथळा यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. इतकंच नव्हे तर, त्याच्यावर एमपीडीए (झोपडपट्टी दादा) कायद्यानुसार देखील पूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे. हाणामारीत इतरही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
“सहकाऱ्यांची चूक असेल तर कारवाई करा, आता आम्ही..”, विधानभवन राडा प्रकरणी पडळकरांचं वक्तव्य
सखोल चौकशीचे आदेश
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी विधिमंडळात बोलताना गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता, एका कथित जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यानंतरही दोघांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडले.
पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अंदाज काय?
घटनेच्या दिवशी, आव्हाड यांना त्यांच्या मोबाइलवर अपशब्दांनी भरलेला धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. हे प्रकरण त्यांनी सभागृहात उघड केले होते. त्यानंतर ते सभागृहाबाहेर पडले, आणि त्याचवेळी पडळकर आपल्या समर्थकांसह तेथे दाखल झाले. पडळकर यांनी नितीन देशमुख यांच्याकडे बघून हातवारे केले अन् त्यानंतर तिघांनी मिळून हल्ला केला, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
सुरक्षितता आणि शिस्तीवर प्रश्न
या प्रकारानंतर विधिमंडळातील सुरक्षिततेवर आणि शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री विकास आणि शांततेचे बोल करत असताना, दुसरीकडे आमदारांचे समर्थक रस्त्यावर उतरून हिंसक वर्तन करत असल्याचे चित्र समोर येत आहे. ही घटना राजकीय संस्कृतीच्या अधोगतीचे प्रतीक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.