मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली, धुराचे मोठे-मोठे लोट

Fire At Legislative Building Entrance In Mumbai : मुंबईतील विधान भवन (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग लागल्याचं वृत्त समोर आलंय. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय. इलेक्ट्रिक बोर्डाला शॉट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे धूर (Fire) सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात (Mumbai) येत आहे. धूर बंद व्हावा यासारण्यात आल्या. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचरण करण्यात आल्या आहेत.
कान्समध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरेंचा ‘खालिद का शिवाजी’
आज दुपारच्या वेळी अचानक विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर सर्वत्र धूर बघायला मिळाला होता. ही आग गेटजवळील भागात लागली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य निर्माण झालं होतं. परिसरात मोठी खळबळ उडाली होती, तर नागरिकांमध्ये मोठं (Vidhan Bhavan Fire) भीतीचं वातावरण होतं. परिसरात धुराचे मोठे-मोठे लोट पाहायला मिळत होते. आग लागल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं होतं.
विधान भवनाचा परिसर हा अतिशय महत्वाचा अन् संवेदनशील आहे. त्यामुळे याच परिसरात आग लागल्यामुळे खूप गडबड झाली होती. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या. अतिशय वेगात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. यावेळी विधान भवनाच्या परिसरामध्ये आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. त्यानंतर ते जेवणासाठी निघाले असता, ही घटना घडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सावधान! अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस अन्…, हवामान विभागाने कोणता इशारा दिला?
अजून या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा परिसर संपूर्ण रिकामा करण्यात आला आहे. तर आग नेमकी कशी लागली, याचा सविस्तर तपास केला जातोय. विधान भवन कंपाऊंडमधील तळमजल्यावरील प्रवेश तपासणी कक्षात आग केवळ इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स, इलेक्ट्रिक स्विचबोर्ड इत्यादींमध्येच मर्यादित होती, अशी माहिती मिळत आहे.