Israel Wildfires: मोठी बातमी! इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, आणीबाणी जाहीर

Israel Wildfires:  मोठी बातमी! इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, आणीबाणी जाहीर

Israel Wildfires:  गेल्या दोन वर्षांपासून इस्त्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) सुरु असणाऱ्या युध्दामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहे. तर आता इस्त्रायलमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार इस्त्रायलमधील जेरुसलेमजवळ (Jerusalem) असणाऱ्या जंगलात (Israel Wildfires) काही दिवसांपूर्वी लागलेली आग आता झपाट्याने वाढत आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

जंगलात लागलेली आग लवकरच जेरुसलेम शहरातील आतील भागात पोहोचण्याची शक्यता असल्याने आणीबाणी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी दिली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आग आणि धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना गुदमरण्याचा त्रास होत आहे. तसेच आगीमुळे अनेक लोक जखमी देखील झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार अग्रिशामक दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्यही तैनात करण्यात आले आहे. पोलिसांकडून जेरुसलेम आणि तेल अवीवला जोडणारा रस्ता देखील बंद करण्यात आला असून संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.

अनेक देशांनी मदत पाठवली

दिवसांदिवस आग वाढत असल्याने इस्त्रायलला अनेक देशांकडून मदत देखील मिळत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत चालले आहे. उष्ण, कोरड्या हवामानामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी वाढत चालली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  इटली, क्रोएशिया, स्पेन, फ्रान्स आणि रोमानियाने इस्रायलला मदत पाठवली आहे. उत्तर मॅसेडोनिया आणि सायप्रससह इतर अनेक देशांनीही त्यांची विमाने पाठवली आहेत.

इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, 10 हून अधिक अग्निशमन दलाची विमाने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जंगलातील आगीबाबत इशारा दिला आहे. पश्चिमेकडील वारे आगीला अधिक भडकवत आहेत आणि लवकरच ती जेरुसलेमपर्यंत पोहोचू शकते, असे नेतन्याहू म्हणाले आहेत.

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

नेतान्याहू यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आम्हाला शक्य तितक्या लवकर शक्य तितकी मदत हवी आहे. ही एक राष्ट्रीय आणीबाणी आहे. सध्याची प्राथमिकता जेरुसलेमचे संरक्षण करणे आहे.” असं त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube