Mumbai News : मंत्री आशिष शेलारांनी स्पेन दौरा टाळला; नेमकं कारण तरी काय?

Mumbai News : मंत्री आशिष शेलारांनी स्पेन दौरा टाळला; नेमकं कारण तरी काय?

Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

परंतु, आता मंत्री शेलार यांनी या दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती आहे. दौऱ्यासाठी तब्बल सत्तर लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. भारतात सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञानासंदर्भातील अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना सायबर सुरक्षेच्या नावावर विदेश दौरा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल अन् वॉर रूम… ‘; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान CM फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

70 लाख खर्च

आयओटी सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस 2025 ही परिषद 13 मे ते 15 मे दरम्यान स्पेनमधील बार्सिलोना येथे होत आहे. या परिषदेसाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार व खात्याचे सचिव जैन उपस्थित राहणार होते. या दौऱ्यासाठी राज्य सरकारचे 70 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाचा राज्य सरकारकडून 9 मे रोजी जीआर काढण्यात आला आहे.

ब्रिजेश सिंग स्पेन दौऱ्यापासून लांब?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग हे सायबर तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांना या दौऱ्यापासून लांब ठेवण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ब्रिजेश सिंग यांनी इस्राइल दौरा केला होता. या दरम्यान पेगॅसस सॉफ्टवेअरच्या वापरावरून सरकारमध्ये अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. ब्रिजेश सिंग यांचा इस्राइल दौरा वादात सापला होता. सध्या ब्रिजेश सिंग हे माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिव आहेत. इस्रायल दौरा वादात सापडला होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांना स्पेन दौऱ्यापासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे.

‘अंतर्गत सुरक्षेसाठी बैठक बोलवली…आम्ही अलर्टवर’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेलारांचा दौरा रद्द

तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी IOT Solution World Congress and Barcelona Cyber Security Congress 2025 या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून तसे निर्देश विभागाला दिले आहेत. त्यामुळे या दौऱ्याबाबतीत समाजमाध्यमांवर होणारी चर्चा वस्तुस्थितीला धरुन नाही, असे माहिती तंत्रज्ञान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube