पाकिस्तान सुधारणार नाहीच! युद्धबंदीनंतर तीन तासांतच ड्रोन हल्ले; श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू आले. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात इनकमिंग एअर रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि जिल्ह्यात इमर्जन्सी ब्लॅकआउट केले गेले. दरम्यान, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, येथे कोणतेही स्फोट झालेले नाहीत असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
#WATCH | Rajasthan: A complete blackout has been enforced in Jaisalmer
(Visuals deferred by an unspecified time) pic.twitter.com/VwdgLTGyQy
— ANI (@ANI) May 10, 2025
या हल्ल्यांवर जम्मू काश्मिरचे (Jammu Kashmir Attack) मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की युद्धविरामाचं काय झालं? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यांनी पुढे म्हटले आहे, की ही काही युद्धबंदी नाहीये. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या नुकत्याच कार्यरत झाल्या आहेत. विशेष म्हणजे आज सायंकाळी युद्धबंदीची घोषणा झाली होती. युद्धबंदीनंतर तीन तास होत नाही तोच पाकिस्तानने पुन्हा हल्ले सुरू केले.
This is no ceasefire. The air defence units in the middle of Srinagar just opened up. pic.twitter.com/HjRh2V3iNW
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
पंजाबातील काही जिल्ह्यांत ब्लॅकआउट
पंजाब राज्यातील बरनाला आणि संगरूर जिल्ह्यांत आज रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ब्लॅकआउट करण्यात आला. होशियारपूरच्या डिप्टी कमिश्नर आशिका जैन यांनी सांगितले की वायूसेनेच्या पठाणकोट आणि आदमपूर बेस येथून मिळालेल्या इनपुट्सच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ‘ब्लॅक आऊट’ जाहीर करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानकडून गोळीबार आणि ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. मात्र अत्यंत सजग आणि सावध असणाऱ्या भारताच्या लष्कराने या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कच्छमध्ये दहा पाकिस्तानी ड्रोन
गुजरात राज्यातील कच्छमध्येही दहा पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. या सर्व ड्रोन्सना भारतीय सैन्याने नाकाम केले. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्येही सैन्याने काही ड्रोन पाडले आहेत. राजस्थानच्या बाडमेरमध्ये एकाच वेळी अनेक ड्रोन दिसून आले. बरनाला मध्ये इमर्जन्सी सायरन वाजवण्यात आले. जम्मूतील नगरोटामध्येही पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. पठाणकोटमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आल आहे. फिरोजपूरमध्येही ब्लॅकआउट केले आहे. प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Several drones have been spotted in the Kutch district. A complete blackout will be implemented now. Please stay safe,Don’t panic.
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) May 10, 2025