“नाहीतर उद्ध्वस्त होऊ..” युद्धविरामासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे गयावया; पडद्यामागं काय घडलं?

India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळण्यास (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. कारण नुकताच युद्धविराम झाला (India Pakistan Ceasefire) आहे. दोन्ही देशांनी याची अधिकृत घोषणाही केली आहे. आता याबाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या विनवण्या केल्या होत्या. भारतापासून आम्हाला वाचवा नाहीतर आम्ही उद्धवस्त होऊ असे पाकिस्तान म्हणत होता.
पाकिस्तानच्या डीजीएमओंनी थेट अमेरिकेत फोन केला होता. याच फोन कॉलनंतर युद्धविरामासाठी हालचाली सुरू झाल्या आणि त्या यशस्वी ठरल्या. यासाठी अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी रात्रभर प्रयत्न केले. शेवटी पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धविरामासाठी भारत तयार झाला.
डीजीएओ अधिकारी पद नेमकं काय
सैन्य संचालन महानिदेशक सैन्यात एक वरिष्ठ पद असते. या अधिकाऱ्याची जबाबदारी मोठी असते. सैन्य मोहिमांची देखरेख आणि समन्वयाचे कामकाज डीजीएमओकडेच असते. पाकिस्तानात डीजीएमओचे काम रणनिती तयार करणे आणि त्याचा अहवाल सैन्य प्रमुखांना देणे असते. डीजीएमओ पडद्यामागे राहून काम करत असतात. पाकिस्तानची जगात होणारी नाचक्की थोपवण्याचे कामही पाकिस्तानचा डीजीएमओ करत असतो. याच अधिकाऱ्याने अमेरिकेत फोन केला होता यानंतर दोन्ही देशांत युद्धविराम करावा लागला.
ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
भारताच्या स्ट्राइकचा पाकड्यांना धसका
भारताने पाकिस्तानात हल्ले केले होते. भारत इतकी आक्रमक कारवाई करेल याचा अंदाज पाकिस्तानाती सैन्य आणि राजकारणी लोकांनाही नव्हता. त्यामुळे अख्ख्या पाकिस्तानात खळबळ उडाली होती. भारताने शु्क्रवारी रात्री पाकिस्तानचे पाच मिलिट्री आणि दोन रडार बेस नष्ट केले होते. ज्या सात बेसवर भारताने हल्ला केला होता त्यातील पाच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत. पंजाब प्रांतच अख्खा पाकिस्तान चालवत आहे. पाकिस्तानचं सैन्य सुद्धा पंजाबींचं सैन्य म्हणून ओळखलं जातं. भारत येथे हल्ला करील याची काहीच कल्पना या लोकांना नव्हती. त्यामुळे आता आणखी नुकसान नको म्हणून पाकिस्तानने युद्धविरामाचा मार्ग निवडला.
मंत्र्यांकडून मिळत होते युद्धबंदीचे संकेत
पाकिस्तानचे दोन वरिष्ठ मंत्री युद्धविरामाचे संकेत देत होते. संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की जर भारताने हल्ले करणे थांबवले तर आम्ही सीजफायर करू. तसेच परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी आज सकाळी सांगितले होते की जर भारताने हल्ले थांबवले तर आम्ही सुद्धा लढाई थांबवू. पाकिस्तानच्या या दोन्ही मंत्र्यांचं म्हणणं होतं की भारत पाकिस्तानवर हल्ले करतोत पण हे सत्य नव्हतं. खरंतर पाकिस्तानकडूनच खोड्या काढल्या जात होत्या. भारताकडून फक्त त्याला प्रत्युत्तर दिलं जात होतं.