अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या खांद्यावर हात.. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या खांद्यावर हात.. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

Sanjay Raut on Operation Sindoor : आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला परतावून लावत आहे हे महत्त्वाचं आहे. पाकिस्तान सरकार हे अत्यंत कमजोर सरकार आहे. तसंच, पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे. (Operation) पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातात असते असं म्हणत पाकिस्तानवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत. मोदींच्या बाजूने खांद्यावर हात टाकायला पाहिजे होता. जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत, त्याच्या पैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला आहे सगळे तटस्थ आहेत असा म्हणत संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्पसाठी मोदींनी रक्ताचे पाणी केलं. त्यांच्यासाठी ते अमेरिकेत गेले त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी कश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प असे म्हणत आहेत की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान सारखेच आहेत, हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे असंही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग : भारताला मोठं यश! ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूद अझहरच्या भावासह टॉप पाचदहशतवादी ठार

ज्यांनी आमचं सरकार पाडलं, ज्यांनी पैशाचा आणि सत्तेचा वापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे. सत्ता गेली, याच्यासारखे आमच्या काही साखर कारखाने शिक्षण संस्था नाहीत. आम्ही फाटके लोक आहोत. आम्हाला चिंता नाही. जे काय घ्यायचं होते ते ईडीने घेऊन टाकल आहे. आम्ही परखडपणे उभे आहोत या प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ते शरद पवार अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलत होते.

भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उभे केलं हे दोन उद्या आणखी 50 उभे करतील. महाराष्ट्रात महाराष्ट्राची वाताहात करतील. सीबीआय, ईडी या माध्यमातून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे. त्यांना जर मोकाट रान द्यायचं असेल तर अशा प्रवृत्तींना जवळ करू नये या मताचे आम्ही आहोत. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही तडजोडवाले नाही असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube