Pune Police : पुण्यात पोलीस असुरक्षित? कोयत्या गँगकडून चक्क पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

Pune Police : पुण्यात पोलीस असुरक्षित? कोयत्या गँगकडून चक्क पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

Pune Police : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, हत्यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यात (Pune) कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

माहितीनुसार पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्यावर चक्क कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आता पुण्यात पोलीस देखील असुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील रामटेकडी परिसरात भाडणं सुरु होते ते सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर एका टोळीतील तरुणाने हल्ला केला. या हल्लात सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (Ratnadeep Gaikwad) जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

प्रकरण काय?

रामटेकडी (Ramtekdi) परिसरात भांडण सुरु होते ते भाडणं सोडवण्यासाठी आणि एकाला अटक करण्यासाठी पोलीस तिकडे गेले होते मात्र त्यावेळी टोळीतील एका तरुणांने पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड जखमी झाले आहे ते वानवडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

इस्त्रायलला हिजबुल्लाहकडून जोरदार प्रत्युत्तर मात्र आजच का? ‘हे’ आहे कारण

पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव निहाल सिंग टाक आहे आणि सध्या तो फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. निहाल सिंग टाक याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube