Pune Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Pune Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, महिलेचा दुर्दैवी  मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Pune Accident News: दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. आता पुण्यातू (Pune Accident) एक भीषण अपघाताची बातमी समोर आली. एसटी बसची चारचाकीला धडक लागून अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) सकाळी 9 वाजता हा अपघात झाला आहे. पुण्यातील खडकी भागात हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

कुत्र्यासोबत घाणेरडे कृत्य करताना पकडला विकृत माणूस; व्हिडिओ व्हायरल होताच अटक 

सविस्तर वृत्त असे की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बोपोडीमध्ये हा अपघात घडला आहे.सकाळी नऊच्या सुमारास एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी एसटी बसमध्ये 12 प्रवासी होते. तर कारमध्ये 7 जण होते. या भीषण अपघातात कारमधील महिलेला जबर मार लागून मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 7 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात 12 एसटी प्रवासी किरकोळ जखमी झाले. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांचं टेन्शन मिटणार, नदीजोड होणार गतीमान.. 

दम्यान, अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हा अपघात अतिशय भीषण होता. या भीषण अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. तर कारचा चक्काचूर झाला. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून हा भीषण अपघात झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube