स्वबळाचा नारा देताच पुण्यातून पहिला आवाज; मनसेच्या साईनाथ बाबरांचा हडपसरवर दावा

स्वबळाचा नारा देताच पुण्यातून पहिला आवाज; मनसेच्या साईनाथ बाबरांचा हडपसरवर दावा

MNS in Pune : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत (Maharashtra Assembly Elections) आहेत. राजकीय घडामोडींत पुण्यातील राजकारणाची (Pune Politics) चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आगामी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे. मोबाइलवरील व्हॉट्सअपवर तसे स्टेटस ठेवत त्यांनी संकेतही दिले आहेत. साईनाथ बाबर यांच्या या स्ट्रॅटेजीची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

वसंत मोरेची विकेट टाकणार म्हणजे टाकणारच! मनसेच्या कार्यकर्त्याच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ  

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनाही लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती. यासाठी दोघांनीही पक्षनेतृत्वाला गळ घातली होती. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. साईनाथ जर दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. वसंत मोरे नाराज झाले होते. तर साईनाथ बाबर यांचं तिकीट निश्चित मानलं जात होतं.

पुढे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर मनसेनेही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी वंचित आघाडीची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत प्रवेश केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

साईनाथ बाबर यांनी मात्र मतदारसंघावरच दावा ठोकला आहे. निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. मनसेकडून मतदारसंघांचा सर्व्हेही झाला आहे. या मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. त्यातच साईनाथ बाबर यांनी थेट मतदारसंघावरच दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरेंच्या मनात साईनाथ बाबर? लोकसभेत वसंत मोरेंना ‘कात्रजचा घाट?’

राज ठाकरेंनी वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे जवळच्याच मित्राने पाय खेचल्याची भावना वसंत मोरेंच्या मनात निर्माण झाली होती. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु, नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube