वसंत मोरेची विकेट टाकणार म्हणजे टाकणारच! मनसेच्या कार्यकर्त्याच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ
Vasant More death threat by MNS Audio clip viral : एकेकाळी पुण्यातील मनसेचे (MNS) फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यावरूनच आपल्याला मनसेकडून जीवे मारण्याची धमकी (death threat) दिली जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
पूजा खेडकर कुटुंबियांना आणखी एक धक्का; महापालिकेने कंपनीच केली सील
या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी कथित ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःला मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असून वसंत मोरे यांना संपवण्याची भाषा करत आहे. हा फोन कॉल वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडीतकर याला करण्यात आला आहे.
यासंदर्भात फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले की, मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला आहे. की अगदी मनसेवाले माझा खून करण्यापर्यंत गेले आहेत. मी या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे. पाहू पोलिस आता यावर काय भुमिका घेतात. असं म्हणत या पोस्टसह मोरे यांनी ही कथित ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे.
नितेश राणे भाजपमध्ये कोणाला नकोसे?
फोन कॉलमध्ये नेमकं काय म्हटलं?
या महिन्यात आपण वसंत मोरेना संपवणार. या महिन्याच्या अखेरीस आपण त्यांना जिवे मारणार आहोत. त्यासाठी माझ्या नावाने पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करा अगोदर देखील माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्यात हा एक होईल या आरोपाखाली मी केवळ एक वर्ष जेलमध्ये जाईल पुन्हा बाहेर येईल. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. असे या फोन कॉल वर बोलणारा व्यक्ती म्हणत आहे.
दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी वंचित आघाडी प्रवेश केला. मात्र मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला आहे. वसंत मोरे यांनी आज थेट मुंबई गाठली. उद्धव ठाकरे यांच्या हजेरीत शिवबंधन हाती बांधलं.