इस्त्रायलला हिजबुल्लाहकडून जोरदार प्रत्युत्तर मात्र आजच का? ‘हे’ आहे कारण
Hezbollah Attack On Israel : गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. यातच आज (25 ऑगस्ट) रोजी इस्रायली हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर हल्ला केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. हिजबुल्लाहच्या (Hezbollah) रॉकेट लाँचर्सच्या विरोधात हा हल्ला करण्यात आला अशी माहिती इस्त्रायलने दिली आहे.
इस्त्रायलने दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी हिजबुल्लाह मध्य इस्रायलवर शेकडो रॉकेट डागणार असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. इस्रायलने 100 लढाऊ विमानांचा वापर करून हल्ला केला असल्याचं सांगितले जात आहे. तर दुसरीकडे या हल्ल्याला प्रत्युत्तर देत हिजबुल्लाहने देखील उत्तर इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोनने हल्ला केला आहे.
हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोनने हल्ला केला अशी माहिती हिजबुल्लाहकडून देण्यात आली आहे.
इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात दक्षिण लेबनॉनच्या कासिमिया प्रदेशात एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे तर खियाम शहरात एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती लेबनॉनच्या राष्ट्रीय वृत्तसंस्था एनएनएने दिली आहे तर हिजबुल्लाहकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इस्त्रायलमधील एकर शहरातील काही लोक जखमी झाले आहे अशी देखील माहिती एनएनएने दिली आहे.
माहितीनुसार, रविवारी हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या मेरॉन तळ आणि व्यापलेल्या गोलान हाइट्समधील चार ठिकाणांसह 11 इस्रायली लष्करी पॉईंट्सना टार्गेट केले होते तर दुसरीकडे इस्रायलने हिजबुल्लाहचे हजारो रॉकेट लाँचर नष्ट केले अशी माहिती इस्रायलने दिली आहे. या हल्ल्यानंतर सध्या दोन्हीकडे शांतात आहे. तरी देखील इस्रायलने आपल्या उत्तरेकडील भागात सुरक्षेच्या सूचना जारी केल्या आहेत.
हिजबुल्लाहकडून रविवारीच हल्ला का?
हिजबुल्लाहकडून इस्त्रायलनर आजच हल्ला का? करण्यात आला याची देखील चर्चा सध्या जोरात सुरु आहे. माहितीनुसार, शिया मुस्लिममध्ये रविवारचे विशेष महत्त्व आहे. इमाम हुसैन यांच्या हत्येनंतर 40 दिवसांनी साजरा केला जाणारा हा दिवस अरबीनच्या दिवसाशी जुळतो. त्यामुळे हिजबुल्लाह आजचा दिवस निवडला असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
PM Modi : महिलांवर अपराध करणारे सुटता कामा नये, पंतप्रधान मोदींचा इशारा
तर दुसरीकडे अल जझीराच्या म्हणण्यानुसार, इस्रायल सध्या स्व-संरक्षण आणि इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत असल्याची भाषा वापर असल्याने सध्या तरी इस्रायल संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही असं अल जझीराने म्हटले आहे.