PM Modi : महिलांवर अपराध करणारे सुटता कामा नये, पंतप्रधान मोदींचा इशारा
PM Modi : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सम्पूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. वाढत्या घटनेमुळे विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील या प्रकरणात भाष्य केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते.
जळगाव येथे लखपती दीदी (Lakhpati Didi) कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात आज तिन्ही दलात महीला अधिकारी आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणात फायटर, पायलट महिला बनत आहे. आम्ही देशात नारिशक्ती कायदा बनवला तसेच राजकारणात महीलांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पूढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. दोषीला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नये. देशात सरकारे येतील आणी जातील पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच देशात महिलांच्या रक्षणासाठी कायदे केले जात आहे. महीलांसाठी ई-एफआयआर देखील सूरू झाल्या आहेत. महीलांवर होणाऱ्या गुन्ह्यासाठी फाशी आणि जन्मपेठेची शिक्षा दिली जात आहे. असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच महिलांची लग्राच्या नावाने फसवणूक होत होती मात्र आम्ही त्याबाबात देखील कायदा आणला आणि महिलांच्या समस्यांसाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे आश्र्वासन देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांचं टेन्शन मिटणार, नदीजोड होणार गतीमान..
तसेच यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला पुढील अनेक वर्षांसाठी महायुतीच्या सरकारची गरज आहे. महायुती सरकार म्हणजे उद्योग आणि नोकरीची गॅरंटी आहे. असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.