मराठा आरक्षणासाठी फडणवीसांचा अडथळा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलं

मराठा आरक्षणासाठी फडणवीसांचा अडथळा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलं

Eknath Shinde On Manoj Jarnage : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) तग धरुन बसले आहेत. या मुद्द्यावरुन जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत आहेत. मराठा आरक्षणला देवेंद्र फडणवीसांचा अडथळा येत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्यावर फडणवीसांनी थेट हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारा, त्यांनी सांगितलं तर मी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं स्पष्ट केलं. जरांगेचे आरोप त्यानंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण आता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. मराठा आरक्षणासाठी मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तिघेही एकत्र बसून विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जो कायदा तयार करण्यात आला त्यात देवेंद्र फडणवीसांसह मंत्रिमंडळाची महत्वाची भूमिका होती. मनोज जरांगे यांच्या मागणीनूसार शिंदे समिती, नोंदी शोधून दिल्या आहेत. मराठा समाजलाा 10 टक्के आरक्षणासह सुविधा दिल्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

Sanjay Pandey: ‘जनहित’ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा पक्ष अन् चिन्ह ठरलं!

तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने आम्हाला यामध्ये सहकार्य केले पाहिजे. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम झालं. मनोज जरांगेंनी असं म्हणणं चुकीचं आहे, त्यात तथ्य नाही, आम्ही जे निर्णय घेतो ते सर्वांच्या सहमतीने घेतो, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत, तोपर्यंत आरक्षण….; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असतात. एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे काम करतो, त्यांना माझं पाठबळ आहे. मराठा आरक्षणाला माझ्या अडथळ्याबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा, शिंदे यांचा आरक्षण देण्याबाबतचा प्रयत्न मी थांबवला असं त्यांनी सांगितलं तर मी माझ्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

मनोज जरांगे यांचे आरोप काय?
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा संपवला, मुस्लिम संपवला, धनगर संपवला, मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी पाच वर्ष काम केलं नाही फक्त फोडाफोडी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील पण, त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube