Punit Balan Group चा स्तुत्य उपक्रम; राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक

Punit Balan Group चा स्तुत्य उपक्रम; राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक

Punit Balan Groups gives E bike to players : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुपने राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना ( State Championship ) प्रोत्साहनपर बक्षीस ( E bike ) दिले आहे.

माढ्यासाठी धैर्यशील मोहितेंची भाजपला सोडचिठ्ठी; राजीनामा बावनकुळेंनी केला कन्फर्म!

रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 42 व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने इलेक्ट्रिक बाईक बक्षीस देण्यात आली. धाराशिव येथील अश्विनी शिंदे आणि ठाणे जिल्हयातील रूपेश कोंडाळकर (जि. ठाणे) अशी या दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. या दोघांना ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते या बाईक नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इलेक्ट्रिक बाइक देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही बक्षिसे देण्यात आली.

मग मंडलिक कोल्हापूरचे वारसदार आहेत का? शाहू महाराजांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून युवा खेळाडूना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. यापूर्वी विविध खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना दत्तक घेण्यात आले असून त्यांची संपूर्ण जबाबदारी ‘पुनीत बालन ग्रुप’ने घेतली आहे. यामध्ये होतकरु आणि गुणी खेळाडूंचा समावेश असल्याने या खेळाडूंच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मदतीचा मोठा उपयोग होतो.

याबद्दल सांगताना पुनीत बालन ग्रुपचे मालक पुनीत बालन म्हणाले की, खेळाडूंमध्ये असलेल्या गुणांची कदर करून त्यांना योग्य वेळी योग्य मदत केली तर आपल्यामागे कुणीतरी आहे असा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो आणि त्यांच्याकडून अधिक चांगली कामगिरी होऊ शकते. याच भावनेतून हे बक्षीस देण्यात आलं आहे. हेच युवा खेळाडू भविष्यात क्रिडा क्षेत्रात राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज